ठळक बातम्या

 30 मार्च 2024 सकाळच्या प्रमुख बातम्या आणि इतर बातम्या वाचा :-


राज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले

Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय.
राज्यातील काही भागांमध्ये पाऊस तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तापमानाचा पारा हा  40 ते 42 डिग्री से. राहणार असल्याच सांगण्यात येत आहे. सरासरी कमाल तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्रीने तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


इथे उन्हाचा तडाखा

हवामान विभागाने आज अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी ठिकाणी तापमान वाढेल, असाही अंदाज दिलाय. तर अकोला, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. 


इथे पाऊस

धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती लातूर, धाराशिव,  संभाजीनगर, जालना जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज दिला. उद्या म्हणजेच शनिवारी नाशिक, हिंगोली, धाराशिव, लातूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. 


उन्हांच्या झळांपासून अशी घ्या काळजी 


  • भरपूर पाणी प्या त्यामुळे डिहायड्रेशपासून बचाव होईल.
  • सुती , सैल, फिक्या रंगाचे कपडे घाला. त्यामुळे उष्णता जास्त शोषली जात नाही. ज्यामुळे उन्हाचा त्रास होणार नाही.
  • कडक उन्हात जाणे टाळा. दुपारच्या रणरणत्या उन्हात बाहेर पडू नका.
  • बाहेर जायची गरज असेलच तर डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्री घ्या. शरीर पूर्णपणे झाका. पाण्याची बाटली आणि सनस्क्रीन नेहमी सोबत ठेवा.
  • बदलत्या वातावरणामुळे तब्बेतीत बिघाड होऊ शकतो, तो सांभाळा. 
  • काही ठिकाणी उन्हाळा आणि काही ठिकाणी पावसाळा असं महाराष्ट्राचं तापमान असल्यामुळे तब्बेतीची विशेष काळजी घ्या.


अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा



    राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा देत नगर दक्षिणमधून लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी आपण राजीनामा देतोय याचे वाईट वाटतेय, त्याबद्दल आपण माफी मागत असल्याचेही ते म्हणाले. पण आपल्याला लोकसभेत जावून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मांडायचे असल्याचेही ते म्हणाले.

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नगर दक्षिणमधून ते लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी तुमचे नुकसान होऊ देणार नाही. मी त्याची भरपाई करणार असे कार्यकर्त्यांना म्हणताना अक्षरश: रडू कोसळले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या वयात आपण त्रास दिला. आता त्यांच्या नेतृत्वाखाली आपण लोकसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू असेही त्यांनी सांगितले. आपल्यावर आज ही वेळ का आणि कोणी आणली याबाबतही कधीतरी बोलू असेही ते म्हणाले. आमदारकीचे अनेक महिने शिल्लक असताना आपल्याला राजीनामा द्यावा लागत आहे. कायद्यात अडकू नये म्हणून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात अधिकृत प्रवेश केला. त्यांनी तुतारी चिन्ह असलेल उपरणे खांद्यावर घेतले आणि तुतारी चिन्हाचा बोर्ड हातात झळकावला, त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रतिसाद दिला. मी आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. नंतर कोविड आला. काही जणांनी मला विचारले तुम्ही गुवाहाटीला गेले का ? छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला. मी आमदार असो किंवा नसो अजित पवार राजकारणात राहिले पाहीजेत अशी भूमिका त्यांनी मांडली.




                                                             धन्यवाद !

                                                    👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन Update साठी Follow करा .....

No comments:

Post a Comment

भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन पदांची मेगा भरती

  भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' नऊ हजार पदांची मेगा भरती | RRb R equirement 2024. भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' (RRB Technician)...