Thursday, March 21, 2024

Free Education for Girl Child In मुलींना मोफत शिक्षण योजना संपूर्ण माहिती Maharashtra 2024:

 आता महाराष्ट्र राज्यातील मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण, येत्या जून पासून मिळणार थेट प्रवेश, पहा काय आहे योजना ?


राज्यात कमी उत्पन्न असलेल्या म्हणजेच ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलींना मोफत शिक्षण (Free Education for Girl Child In Maharashtra 2024) मिळणार आहे.

आता पालकांना मुलींसाठी १ रुपया पण शिक्षणावर खर्च करायची गरज नाही. मुलींच्या शिक्षण खर्चाची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. जुन २०२४ पासून मुलींच्या शिक्षणाचा (mulina mofat shikshan) संपूर्ण खर्च आता राज्य सरकार द्वारे केला जाणार आहे.


मित्रांनो, पुढे पाहूयात काय आहे मुलींना मोफत शिक्षण योजना (Free Education for Girls Scheme २०२४) आणि त्यासाठी काय असणार अटी, निकष, पात्रता आणि कागदपत्रे सविस्तर माहिती.


मुलींना मोफत शिक्षण योजना २०२४ संपूर्ण माहिती

Girls Free Education Scheme 2024 Full Information: मुलींना मोफत शिक्षण या योजनेची घोषणा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असून, येत्या जुन २०२४ पासून या योजनेचे लाभ राज्यातील गरीब मध्यमवर्गातील मुलींना होणार असून, आता सगळ्याच मुलींना उच्च शिक्षण अगदी मोफत घेता येणारआहे.


इंजिनीयरिंग, मेडीकल, तंत्रशिक्षण सारख्या न परवडणाऱ्या, खर्चिक शिक्षणा सोबत एकूण ८०० कोर्स मध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे. या संबंधी अधिकृत घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.


अलीकडच्या काळात शाळा, महाविद्यालये यांच्या प्रवेश शुल्कात भरमसाट वाढ झाल्याची दिसत आहे. यामुळे गरीब, मध्यम वर्गातील मुली-मुले अतिशय हुशार असून देखील केवळ प्रवेश फी अधिक असल्यामुळे उच्च शिक्षणापासून वंचित झाल्याचे दिसत आहे.

म्हणूनच गरीब, मध्यम वर्गातील मुलींसाठी ही आनंदाची बातमी आहे. या योजनेमुळे राज्यातील सर्वच मुली उच्चशिक्षित होणार आहे



योजनेचे नाव मुलींना मोफत शिक्षण योजना : Free Education for Girl Child In Maharashtra 2024

राज्य -महाराष्ट्र राज्य

वर्ष २०२४ - २०२५

घोषणा- उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सुरुवात- जून २०२४

उद्देश- गरीब कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देणे

लाभ- मेडिकल, तंत्रशिक्षण, इंजिनियरिंग सारख्या ८००+ कोर्स मध्ये मोफत शिक्षण घेण्याची संधी.

लाभार्थी- गरीब कुटुंबातील महाराष्ट्रातील सर्व मुली


मुलींना मोफत शिक्षण योजना २०२४ पात्रता निकष

Free Education For Girl In Maharashtra 2024 Eligibility Criteria:


मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे:


१. मोफत शिक्षण घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखांपेक्षा कमी असावे.

२. महाराष्ट्र राज्यातील मुली ह्या योजनेसाठी पात्र असतील. मुलींचे आई वडील महाराष्ट्रात कायमस्वरूपी राहत असावेत.


पात्र मुलींना येत्या जून २०२४ पासून उच्च शिक्षण फ्री मध्ये मिळणार आहे.


मुलींना मोफत शिक्षण योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे

Free Education For Girl In Maharashtra 2024 Documents: मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.


  1. अर्जदार मुलीचे आधार कार्ड.
  2. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र/ दाखला.
  3. रहिवासी प्रमाणपत्र / डोमासाइल प्रमाणपत्र.
  4. शाळा सोडल्याचा दाखला (TC).
  5. मागील वर्षाचे गुणपत्रक/मार्कशीट.
  6. मुलीचा पासपोर्ट साईज फोटो.

आवश्यक कागदपत्रे हे जून महिन्याच्या आधीच जमा करून ठेवल्यास प्रवेश प्रक्रियेला विलंब होणार नाही. तसेच वरील कागदपत्रे हि मूळप्रत सह झेरोक्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

मुलींना मोफत शिक्षण योजना २०२४ शाळा, महाविद्यालय प्रवेश माहिती

Girls Free Education Scheme 2024 School, College Admission Information:


मोफत शिक्षण योजने अंतर्गत राज्यातील गरीब मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे. यामध्ये Private Schools, CBSC School, Government Schools Colleges यांसारख्या शाळा कॉलेजमध्ये फ्री शिक्षण (Free Education) घेता येणार आहे.


ह्या योजनेचा लाभ जून २०२४ पासून घेता येणार आहे. मोफत प्रवेश प्रक्रिया (free Admission Process) जून पासूनच महाराष्ट्र राज्यात सर्वत्र चालू होणार आहे.


प्रवेश घेताना या योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही, तुम्हाला हव्या त्या कॉलेज मध्ये प्रवेश करताना Admission Form सोबतच वर दिलेल्या कागदपत्रे जोडायची आहे. सर्व पात्र मुलींना उच्च शिक्षणासाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे.


पालकांनो, जर तुमच्या कुटुंबात मुलगी असेल तर ‘मुलींना मोफत शिक्षण’ (mulina mofat shikshan yojana) या योजनेचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा. तसेच इतर गरीब मुलींना या योजनेचा फायदा व्हावा, असे तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही हा लेख महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत पाठवा या मुळे आपल्या मुली, बहिणी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्या उच्च शिक्षित होतील.

धन्यवाद.


सद्या वरील योजना ही घोषणा स्वरुपात आहे, अद्याप अधिकृत GR निघाला नाही, पुढे नवीन सरकार स्थापन होणार आहे, त्या मुळे ‘मुलींना मोफत शिक्षण योजना’ प्रत्यक्षात कधी अंमलबजावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.



No comments:

Post a Comment

भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन पदांची मेगा भरती

  भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' नऊ हजार पदांची मेगा भरती | RRb R equirement 2024. भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' (RRB Technician)...