Savitribai Phule Aadhaar yojana :-
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
तर मित्रांनो यासाठी अर्ज कुठे करायचा यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत पात्रता काय असणार आहे या योजनेची उद्दिष्टे काय आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा संपूर्ण लेख नक्की वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन विकास महामंडळाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी 60000 रुपये ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देणार आहे.
या योजनेचा उद्देश गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी आहे त्यामुळे ही योजना राबवली जाते.
यासाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे.
अर्जदार विद्यार्थी हा OBC, ST किंवा SC प्रवर्गातील असावा.
विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर गावामध्ये होस्टेलमध्ये किंवा वस्तीगृहात राहत असावा.
यासाठी विद्यार्थ्यांना मेरिट लिस्ट द्वारे निवडले जाणार आहे.
मागील शैक्षणिक वर्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत त्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Scolership :-
यासाठी कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील .
- आधार कार्ड
- बँक पासबुक( विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांचे)
- विद्यार्थ्यांचा दहावी आणि बारावीचा निकाल
- महाविद्यालयांमध्ये किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेली पावती
- SC, ST, OBC कास्ट सर्टिफिकेट.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
वरील सर्व कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत अर्जदाराने हे कागदपत्र फॉर्म भरताना जमा करायचे आहेत.
या योजनेचा GR निघालेला नाही यामुळे अर्ज कसा करायचा कुठून करायचा याची अधिकृत माहिती आलेली नाही परंतु यासाठी अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.
ऑफलाईन अर्ज इतर मागासवर्ग बहुजन विकास महामंडळ या कार्यालयात जाऊन भरायचा आहे.
No comments:
Post a Comment