२९ मार्च जन्म
१८६९: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १
जानेवारी १९४४)
१९१८: वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल
१९९२)
१९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ
यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च २०१०)
१९२९: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १९
ऑगस्ट १९९३)
१९३०: मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.
१९४३: इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म.
१९४८: साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे
कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.
२९ मार्च मृत्यू
१५५२: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च
१५०४)
१९६४: इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन.
१९७१: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचे निधन. (जन्म: २
नोव्हेंबर १८८६)
१९९७: सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या
पुपुल जयकर यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)
२९ मार्च महत्वाच्या घटना
- Ø १८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.
- Ø १८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.
- Ø १९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
- Ø १९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.
- Ø १९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.
- Ø १९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.
- Ø २०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.
- Ø १९४२: क्रिप्स योजना जाहीर
No comments:
Post a Comment