वसंतराव नाईक बिन व्याजी कर्ज योजना :-
Vasantrao Naik Loan Yojana अंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्यराज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी दिले जाते.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना:
राज्यातील बहुतांश युवक सुशिक्षित असून त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यामुळे ते स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असतात परंतु उद्योग सुरु करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते परंतु आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांच्याजवळ उद्योग सुरु करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते तसेच त्यांना कोणी पैसे उधार देत नाहीत त्यामुळे राज्यातील युवकाची स्वतःचा उद्योग सुरु करण्याची इच्छा असून सुद्धा त्याला उद्योग सुरु करता येत नाही व त्यामुळे राज्यातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली शासनाच्या निदर्शनास आली त्यामुळे राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील युवकांचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यात Vasantrao Naik Karj Yojana ची सुरुवात केली.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करणे.
आम्ही Vasantrao Naik Karj Yojana ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील नागरीक असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून कर्ज मिळवून स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करू शकतील.
योजनेचे नाव |
Vasantrao Naik Loan Yojana |
राज्य |
महाराष्ट्र |
विभाग |
इतर मागास बहुजन कल्याण विभाग |
उद्देश्य |
राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व |
लाभार्थी |
राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील नागरीक |
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन/ऑफलाईन |
Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana चे वैशिष्ट्य:-
- महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे वसंतराव नाईक कर्ज योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येत नाही.
- या योजनेअंतर्गत शासनाचा सहभाग 100 टक्के आहे.
- योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदाराला शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही व त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- कर्जाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
Vasantrao Naik Mahamandal Loan अंतर्गत दिले जाणारे प्राधान्य:-
- निराधार व्यक्ती
- विधवा महिला
- शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरुण मुले/मुली यांना प्राधान्य देण्यात येते.
Vasantrao Naik Arthik Vikas Mahamandal Yojana चे लाभार्थी:-
- महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरीक
VJNT Loan Scheme चा फायदा:-
- योजनेअंतर्गत राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील युवकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- राज्यातील युवकांचे जीवनमान सुधारेल.
- राज्यातील बेरोजगारी संपेल व राज्याचा औद्योगिक विकास होईल.
- राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
- नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही.
Vasantrao Naik Loan Yojana अंतर्गत आवश्यक कागदपत्रे:-
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला (Tahsil)
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- वीजबिल (optional)
- मोबाईल नंबर
- उत्पनाचा दाखला
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- प्रतिज्ञा पत्र
- जातीचा दाखला
- जन्म प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला)
- व्यवसाय सुरु करणार त्याचे कोटेशन
- बँक खात्याची माहिती
Vasantrao Naik Loan Scheme Online Application:-
- अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (वैयक्तिक माहिती/पत्त्याचा तपशील/उत्पन्न,व्यवसाय,बँक तपशील/दस्तऐवज तपशील/घोषणापत्र) भरावी लागेल तसेच आवश्यक दस्तावेज अपलोड करावी लागतील सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana |
|
वसंतराव नाईक योजना संपर्क क्रमांक |
022-2620 2588 |
वसंतराव नाईक योजना कार्यालय पत्ता |
जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, |
Disclaimer:- आम्ही आणि आमची टीम तुम्हाला ही माहिती पुरवतो. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या आणि दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल नीट माहिती मिळेल, त्यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.
धन्यवाद !
👇👇👇👇👇👇👇👇
अशाच नवनवीन Update साठी Follow करा ......
No comments:
Post a Comment