Wednesday, March 27, 2024

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मार्फत थेट कर्ज योजना

  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मार्फत थेट कर्ज योजना :-




थेट कर्ज योजना:-

थेट कर्ज योजना राबविताना अवलंबविण्याची कार्यपद्धती  


    सदर योजनेअंतर्गत महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलातून थेट कर्ज योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे.

  1. प्रकल्प मर्यादा रु. 1,00,000/- पर्यंत
  2. महामंडळाचा सहभाग रु. 85,000/- इतका असून अनुदान रु. 10,000/- (मर्यादेसह) आहे.
  3. अर्जदाराचा सहभाग रु. 5,000/- आहे.
  4. सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात (36 महिन्यांच्या) आत करावयाची आहे.
  5. सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर 4% द.सा.द.शे. व्याजदर आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रु. 1,00,000/- पर्यंतचे कर्ज महामंडळामार्फत मंजूर केले जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग रु. 85,000/- इतका असून अनुदान रु. 10,000/- (मर्यादेसह) आहे. तसेच अर्जदाराचा सहभाग रु. 5,000/- आहे. सदर कर्जाची परतफेड समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात करावयाची आहे. सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर 4% द.सा.द.शे व्याजदर आहे.

मागासवर्गीय घटकातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व जास्तीतजास्त लोकांना लाभ घेता यावा. तसेच बँकेमार्फत कर्ज देताना येणाऱ्या अडचणी व कर्ज मंजूर होताना होणारा विलंब टाळण्याकरिता थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा रु. 25,000/- वरुन रु. 1,00,000/- पर्यंत वाढविण्याबाबत शासन निर्णय क्रमांक एमपीसी-2017/प्र.क्र.274/महामंडळे, दिनांक 21 डिसेंबर 2018 नुसार मंजूरी दिलेली आहे.

कर्ज मंजूरीकरिता आवश्यक कागदपत्रे

1

जातीचा दाखला

2

उत्पन्नाचा दाखला

3

रहिवाशी पुरावा (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी)

4

व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की, मालाचे किंमतीपत्रक (Cotation)




आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते

1

अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी केली जाते.

2

प्रादेशिक व्यवस्थापक यांचेकडे मंजूरी व निधी मागणी केली जाते.

3

प्रादेशिक व्यवस्थापक मुख्य कार्यालयाकडे संबंधित कर्ज प्रकरणात निधी मागणी करतात

4

संबंधित कर्ज प्रकरणांत जिल्हा कार्यालयाकडून लाभार्थ्याच्या सहभागाची रक्कम वगळून पहिला हप्ता (75%) अदा केला जातो व प्रत्यक्ष उद्योग सुरु झाल्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक यांनी केलेल्या तपासणी अभिप्रायानुसार दुसरा हप्ता (25%) अदा केला जातो.


मागासवर्गीयांसाठी अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

  • महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रु. 20,000 ते कमाल रु. पर्यंत कर्ज. 50,000/- राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत मंजूर केले जातात. यामध्ये बँक कर्ज 50% आणि कॉर्पोरेशन अनुदान 50% (किमान मर्यादा रु. 10,000/- पर्यंत) समाविष्ट आहे.
  • महामंडळामार्फत योजना राबविताना खालील आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्यांकडून घेतली जातात व त्यानुसार योग्य ते प्रस्ताव बँकेकडे पाठवले जातात. अशा प्रकरणांमध्ये बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर, रु. 10,000/- किंवा त्यापेक्षा कमी अनुदान रकमेचा धनादेश संबंधित बँकेला पाठवला जातो आणि त्यानंतर बँकेमार्फत अर्जदाराला कर्ज वितरित केले जाते. विशेष घटक योजनेंतर्गत कर्ज प्रकरण अशा प्रकारे हाताळले जाते. कर्ज स्वीकारताना आणि बँकेला पाठवताना अर्जदारांचे तपशील आणि कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
  • या योजनेअंतर्गत प्रकल्प गुंतवणूक असलेल्या व्यवसायांना रु. पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. 50,000/-. यामध्ये कमाल रु. बँकेकडून 10,000 ते 50,000 (मर्यादेसह) कर्ज मंजूर केले जाते. यामध्ये रु. 10,000 अनुदान महामंडळाकडून आणि उर्वरित बँक त्यांच्या व्याजदराने देतात.

अर्ज दाखल करण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा 



व त्यानंतर नवयुग लाभार्थी पोर्टल या वरती क्लिक करून पुढे जावे 

व नंतर Navyug Beneficiary Schemes option दिसेल त्यावरती जाऊन Subsidy Scheme select करावे 

आणि दिलेली माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. व अर्ज दाखल करावा .


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 


No comments:

Post a Comment

भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन पदांची मेगा भरती

  भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' नऊ हजार पदांची मेगा भरती | RRb R equirement 2024. भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' (RRB Technician)...