Wednesday, March 27, 2024

Change Aadhar card Address From Home :- आता घरबसल्या बदला/अपडेट आधार कार्ड वरील पत्ता.

PM विश्वकर्मा योजने साठी अपडेट करा आधार कार्ड वरील पत्ता (C/O) घरबसल्या :-


    आधार कार्ड हे भारत सरकारद्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेले ओळखपत्र आहे. त्यावर १२ अंकी अद्वितीय क्रमांक छापलेला आहे जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केला आहे.हा क्रमांक भारतात कुठेही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा असेल. 

        इंडिया पोस्ट आणि U.I.D.I द्वारे प्राप्त UIDAI च्या वेबसाइटवरून डाउनलोड केलेले ई-आधार दोन्ही समान वैध आहेत. कोणतीही व्यक्ती आधारसाठी नोंदणी करू शकते जर तो भारताचा रहिवासी असेल आणि U.I.D.I. वय आणि लिंग विचारात न घेता UGC द्वारे विहित केलेल्या पडताळणी प्रक्रियेचे समाधान करते. प्रत्येक व्यक्ती फक्त एकदाच नोंदणी करू शकते. नावनोंदणी मोफत आहे. आधार कार्ड हे फक्त एक ओळखपत्र आहे आणि ते नागरिकत्वाचे प्रमाणपत्र नाही.

       आधार कार्ड आता प्रत्येक गोष्टीसाठी अत्यावश्यक बनले आहे. ओळखीसाठी सर्वत्र आधार कार्ड मागितले जाते. आधार कार्डचे महत्त्व वाढवत भारत सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर ते काम करणे कठीण होईल. इतर कोणीही हे कार्ड वापरू शकत नाही, तर रेशनकार्डसह इतर अनेक प्रमाणपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या चुका झाल्या आहेत आणि होत आहेत.


आधार कार्ड हे खालील योजने साठी अत्यंत महत्वाचे आहे.

     

  1. PM VISHVKARMA योजने साठी आधार अनिवार्य करण्यात आला आहे.
  2. जन धन खाते उघडण्यासाठी
  3. एलपीजी सबसिडी मिळवण्यासाठी
  4. रेल्वे तिकिटांवर सूट मिळवण्यासाठी
  5. परीक्षेला बसण्यासाठी (उदा. IIT JEE साठी)
  6. डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी आधार आवश्यक
  7. आधार कार्डाशिवाय भविष्य निर्वाह निधी मिळणार नाही

अशा बऱ्याच योजने साठी अपडेटेड आधार कार्ड आवश्यक आहे तर आपण जाणून घेऊया 
आपण घरबसल्या आधार कार्ड वरील पत्ता दुरुस्ती करू शकतो  त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे.
  1.  सरपंच किंवा ग्रामसेवक यांचे UIDAI ने जरी केलेले Standard सर्टिफिकेट हे  ग्रामीण भागामध्ये आपल्याला सुलभ   रित्या उपलब्ध असणारा पुरावा आहे. (Standard सर्टिफिकेट Download करण्यासाठी दिलेल्या लिंक ला क्लीक करा pdf मधील ११ पेज)
  2. Printed National Bank Passbook
  3. lite Bill
  4. Gas Passbook
  5. Ration Card Or E- Ration Card
  6. मतदान ओळखपत्र 
पत्ता बदलण्या साठी सर्व प्रथम UIDAI च्या OFFICIAL वेबसाईट वरती या. व User Login यावरती क्लिक करून १२ अंकी आधार कार्ड नंबर टाकून otp  login करून घ्या व पुढे dashboard ओपन होईल त्यामधील address update वरती क्लिक करून घ्यावे व विचारलेली आवश्यक माहिती दाखल करून घ्यावी.
व शेवटी रहिवासी पुरावा व्यवस्तीत रित्या scan करून फक्त PDF फॉरमॅट मध्ये अपलोड करून घ्यावे.  व माहिती जतन करावी व ५० रुपयाचे भरून पावती जातन करावी व फक्त २४ तासात आपले आधार कार्ड उपडेट होईल  

जर दिलेल्या कागदपत्रा पैकी कोणतीच पुरावे नसतील तर आपण वडिलांच्या Head Of Family (HOF) based Address Update या पद्धतीचा वापर करून आधार वरील पत्ता बदलू शकतो.



                                                             धन्यवाद !

                                                    👇👇👇👇👇👇👇👇

अशाच नवनवीन Update साठी Follow करा ......



No comments:

Post a Comment

भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन पदांची मेगा भरती

  भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' नऊ हजार पदांची मेगा भरती | RRb R equirement 2024. भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' (RRB Technician)...