Sunday, March 24, 2024

ZP Pune Bharti 2024 : जिल्हा परिषद पुणे येथे 12 वी पासवर 269 पदांसाठी मेगा भरती; ऑनलाईन अर्ज करा

 


ZP Pune Bharti 2024 : जिल्हा परिषद पुणे (Zilla Parishad Pune Bharti) अंतर्गत विविध पदासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत ही भरती होणार आहे.


यामध्ये विविध पदाचा समावेश असून बारावी पास, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवार सुद्धा येथे अर्ज करू शकणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.


ऑनलाईन अर्ज ची लिंक खाली दिलेली आहे त्यानुसार तुम्ही अर्ज सादर करू शकता एकूण 269 रिक्त पदावर ही भरती होणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर 2024 मध्ये पहिल्यांदाच भरती होत आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


या पदाभरती मध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) याचा समावेश आहे. बारावी पास, पदवीधर, आणि पदव्युत्तर उमेदवार येथे अर्ज करू शकणार आहेत.


पदा नुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्यामुळे संपूर्ण माहितीसाठी तुम्ही एकदा जाहिरात डाऊनलोड करून वाचणे आवश्यक असेल, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एमबीबीएस (एमसीआय एमएमसी कौन्सिल) कडली नोंदणी अनिवार्य असेल.


बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यासाठी कमीत कमी बारावी पास तसेच पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला असणं गरजेचं आहे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कोणत्याही शासनमान्य संस्थेतून झालेला असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.


बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी दर महिना 18000 रुपये प्रति महिना मानधन देण्यात येणार असून स्टाफ नर्स साठी 20000 रुपये प्रतिमहिना मानधन देण्यात येणार आहे.

वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 60000 रुपये प्रति महिना मानधन निवड झालेल्या उमेदवारास देणार आहे, वेगवेगळ्या संवर्गानुसार ही भरती असून वैद्यकीय अधिकारीचे एकूण 94 पदे, स्टाफ नर्सची एकूण 78 पदे व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे एकूण 97 पदे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान अंतर्गत भरली जाणार आहेत.


पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी म्हणून एमबीबीएस पदवीधारकाच्या नियुक्तीला येथे प्राधान्य देण्यात येणार आहे.


परंतु अनेक प्रयत्न करूनही एमबीबीएस पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास पंधरावे वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता वैद्यकीय अधिकारी म्हणून एमबीबीएस पदवीधर उपलब्ध होईपर्यंत अथवा 6 ते 11 महिन्याकरिता बी एम एस पदवीधारक उमेदवार यांना वैद्यकीय अधिकारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येणार आहे.


उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत अर्जाची पडताळणी करून मुलाखतीसाठी उमेदवाराला बोलावण्यात येणार आहे.


स्टाफ नर्स व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागून गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.


इच्छुक उमेदवारांनी 11 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, अर्जासोबत जन्मतारखे करिता वयाचा दाखला, दहावीची टीसी, जन्म प्रमाणपत्र जोडावे.


फोटो आयडी, रहिवासी दाखला, लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल.


उमेदवाराने अर्ज करतेवेळेस आपला मोबाईल नंबर व ईमेल आयडी व्यवस्थित रित्या जोडणे सुद्धा आवश्यक असेल अर्ज सोबत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 रुपये आणि मागास प्रवर्गाचे उमेदवारांसाठी 200 रुपये एवढे शुल्क ऑनलाईन पद्धतीने गुगल पे फोन पे वरून तुम्ही भरू शकणार आहात.


तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज (ZP Pune Bharti 2024) करण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी वर लिंक दिलेली आहे त्यावरून सविस्तर माहिती घेऊन ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर सादर करावेत.

No comments:

Post a Comment

भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन पदांची मेगा भरती

  भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' नऊ हजार पदांची मेगा भरती | RRb R equirement 2024. भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' (RRB Technician)...