ठळक बातम्या

 

आज की ताझा खबर: 28 मार्च 2024 सकाळच्या प्रमुख बातम्या आणि इतर बातम्या वाचा :-

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी रिमांडचा आज शेवटचा दिवस आहे.मुख्यमंत्री आज न्यायालयात मोठा खुलासा करणार असल्याचा दावा त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी केला आहे. 
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचे म्हटले आहे. 
  • लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात एनडीएच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये जवळपास एकमत झाले आहे. 
  • सन रायझर हैदराबादने आयपीएलमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या केली आहे.


  1. प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयचा मोठा दिलासा

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एका संदर्भातील घोटाळ्याचा तपास सीबीआयने बंद केला आहे. प्रफुल्ल पटेल हे यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री होते. तेव्हा त्यांच्यावर एअर इंडियासाठी विमान खरेदी व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप होता. त्यांच्या या धोरणामुळे सरकारचं 840 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१७ ला सर्व कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला होता. प्रफुल पटेल गेल्या वर्षी अजित पवार यांच्या नेतृत्वात एनडीए मध्ये सहभागी झाले. त्यानंतर आता हा तपास बंद करण्यात आला आहे.

    2.अभिनेता गोविंदा अहुजा यांचा शिवसेनेत प्रवेश

अभिनेता गोविंदा अहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी गोविंदाला पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केलं. मला मिळालेली जबाबदारी मी योग्य पद्धतीने पार पाडेन, असं गोविंदाने म्हटलं.

   3.इन्कम टॅक्स प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून काँग्रेसला झटका

आयकर प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून काँग्रेसला दणका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आयकर विभागाच्या चार वर्षांच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेच्या आदेशाला आव्हान देणारी काँग्रेसची याचिका फेटाळली आहे.

   4. केजरीवाल यांना त्रास दिला जात आहे, त्यांची प्रकृती ठीक नाहीः सुनीता केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांचा छळ केला जात आहे. त्यांची प्रकृती ठीक नाही. देशात सुरू असलेली हुकूमशाही रोखण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

   5.हिंगोलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफुस

हिंगोली-उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे लोकसभेची जागा गेल्याने महाविकास आघाडीमध्ये धुसफुस आहे. काँग्रेसचे पदाधिकारी सामुहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समजत आहे.  पारंपारिक जागा काँग्रेसची आहे. ठाकरे शिवसेनेकडे गेल्याने आम्ही राजीनामा देणार असल्याचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सूर आहे.

   6.बाळासाहेब ठाकरे आणि माझे संबंध फार वेगळे होते- सुशीलकुमार शिंदे

बाळासाहेब ठाकरे आणि माझे संबंध फार वेगळे होते. बाळासाहेब माझ्याविरोधात प्रचारासाठी सोलापूरला आले आणि सभा न घेता हॉटेल मधून गप्पा मारून निघून गेले. मी मुख्यमंत्री असताना आमदारकी वेळी निवडणूक असताना बाळासाहेब भाषण न करता सोलापुरातून माघारी गेले . मैत्रीला पक्का असणार माणूस होते, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

    7.पुढील दोन दिवस रात्रीही उकाडा

विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानवाढीचा कल कायम आहे. पुढील दोन दिवस तापमानवाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. रात्रीच्या तापमानातही वाढ होऊन उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर प्रति चक्रवाताची स्थिती कायम आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे.

  8.कोल्हापूर, रामटेक, अमरावतीची जागा आम्ही हसत हसत सोडली - संजय राऊत

कोल्हापूर, रामटेक, अमरावतीची जागा आम्ही हसत हसत सोडली. सांगली मधील काही व्यक्तींनी काही भूमिका घेतली आहे पण आमच्या सूचना आहेत, महाविकास आघाडी म्हणून कोणीही कटू भावना व्यक्त करू नये, अशा सूचना  कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

  9.सोने महागले, चांदी झाली स्वस्त

सोने आणि चांदीत या आठवड्यात चढउताराचे सत्र दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहक बुचकाळ्यात पडले आहे. सोने महागले आहे तर चांदी स्वस्त झाली आहे. मार्च महिन्यात दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली आहे.

  10.छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानात वाढ

छत्रपती संभाजीनगरच्या तापमानात वाढ झाली आहे. यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमान ३९.५ अंशावर तर किमान २२.४ अंशावर पोहोचला आहे. उकाडा वाढल्याने छत्रपती संभाजीनगरकर हैराण झाले आहेत. येत्या पाच दिवसात कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सियसदरम्यान राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने वर्तवली आहे.

  11.मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नावावर नकोसा विक्रम, 16 वर्षांनी पुन्हा असं घडलं.

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची सुरुवात एकदम वाईट झाली आहे. सुरुवातीचे दोन सामने गमवल्याने कर्णधार हार्दिक पांड्यावर टीकेची झोड उठली आहे. असं असताना हार्दिक पांड्याच्या नावावर आता एक नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. 2008 नंतर मुंबई इंडियन्स संघासोबत असं घडलं आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यात मुंबईला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलेल्या संघाची स्थिती सुरुवातीलाच इतकी वाईट होईल याची कल्पनाच नव्हती.

No comments:

Post a Comment

भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन पदांची मेगा भरती

  भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' नऊ हजार पदांची मेगा भरती | RRb R equirement 2024. भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' (RRB Technician)...